|Saturday, October 19, 2019
You are here: Home » leadingnews » पाकिस्तानच्या गोळीबारात बएसएफचा जवान शहीद

पाकिस्तानच्या गोळीबारात बएसएफचा जवान शहीद 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पाकिस्तानच्या कुरगुडय़ा सुरूच आहेत. पाकिस्तानी सैन्याने जम्मू – काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाक सैन्याने बीएसएफच्या चौक्यांवर उखळी तोफांचा मारा केला, तसेच गोळीबार केला त्यात बीएसएफचा जवान शहीद झाला. तर एक नागरिक जखमी झाला आहे.

जम्मूजवळील आरएस पुरा सेक्टरमधील अर्निया भागात आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याने मध्यरात्री 1.10 वाजताच्या सुमारास उखळी तोफांचा मारा केला. तसेच गोळीबार केला. बीएसएफचे एसएम बेस, बडवार आणि निक्कोवाल या चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केले. या गोळीबारात बीएसएफ कॉन्स्टेबल ब्रिजेंद्र बहादूर हे शहीद झाले. ते उत्तर प्रदेशातील आहेत. जेनाज या चौकीवर ते तैन्यात होते.