|Friday, December 13, 2019
You are here: Home » Top News » दोन हत्यांप्रकरणी राम रहिमविरोधात आज सुनावणी

दोन हत्यांप्रकरणी राम रहिमविरोधात आज सुनावणी 

ऑनलाईन टीम / पंचकुला :

साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगावासाची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमविरोधात आणखी दोन हत्या प्रकरणात न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

डेऱयाचा व्यवस्थापक रणजीत सिंह आणि सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती या दोघांच्या हत्येचा आरोप राम रहिमवर आहे. यावर विशेष सीबीआयचे न्यायाधीश जगदीप सिंह यांच्या न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या हत्यांच्या सुनावणीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी निमलष्करी दल आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आल्याची माहिती हरियाणाचे पोलीस महासंचालक बी. एस. संधू यांनी दिली.

Related posts: