|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » विविधा » देशात 663 लोकांमागे फक्त एक पोलिस तैनात

देशात 663 लोकांमागे फक्त एक पोलिस तैनात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्र सरकारनश व्हीआयपी क्लचर संपुष्टात आणण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असल्याचे दिसून आले आहे. देशातील एकुण 20 हजार व्हिआयपींच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी तीन पोलिस तैनात असून त्या तुलनेत 663 लोकांमागे फक्त एकच पोलिस तैनात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हल्पमेंटने केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे पोलीस सुरक्षेचा अहवाल तयार केला आहे. या अहवालातील आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आकडेवारीनुसार देशात सध्या 19.26लाख पोलिस आहेत. यातील 56 हजार 944 पोलीस सध्या 20 हजार 828 लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.