|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जयसिंगपुरात आज शहर शताब्दी वर्ष सांगता समारोह

जयसिंगपुरात आज शहर शताब्दी वर्ष सांगता समारोह 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी आपले जनकपिता जयंसिग महाराजांच्या नावाने वसवलेल्या जयसिंगपूर शहर शताब्दी वर्ष सांगता समारोह 19 व 20 सप्टेंबरला होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख आतिथी म्हणून खासदार श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत. या सांगता समारोहाच्या निमित्ताने क्रांती चौकातील छत्रपती शाहू महाराज व जयंसिग महाराजांच्या पुतळा सुशोभित करण्यात आले असून पालिकेसह सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

21 सप्टेंबर 2016 ला शहर स्थापनेच्या शतक महोत्सवास प्रारंभ झाला होता. वर्षेभर अनेक कार्यक्रम घेण्यात आले. यानिमित्ताने होत असलेल्या सांगता समारंभामध्ये मंगळवार 19 रोजी सकाळी 9 वाजता क्रांती चौकामधील पुतळ्याना अभिवादन करून लोकदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता पालिकेच्या खुल्या नाटय़गृहामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यक्रम होत आहे. तर सायंकाळी 7 वाजता डॉ. मंजुश्री जयसिंगराव पोवार यांचे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य या विषयावर व्याख्यान होणार आहे.

20 रोजी रात्री 8 वाजता झी टीव्ही व ई टीव्ही वाहिणीवरील नामांकित कलाकारांच्यासह जल्लोष शताब्दी वर्षाचा हा स्वरांजली ऑर्केस्ट्रा होणार आहे. रात्री भव्य आतषबाजी करण्यात येणार आहे.

Related posts: