|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तासगावात निवासी उपजिल्हाधिकाऱयांच्या पथकाची कारवाई :

तासगावात निवासी उपजिल्हाधिकाऱयांच्या पथकाची कारवाई : 

प्रतिनिधी/ सांगली

कडेगाव पाठोपाठ आता तासगाव तालुक्यात येरळा नदीच्या काठावर बस्तान बसविलेल्या वाळू तस्करांच्याकडे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यानी मोर्चा वळवला आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी व महसूलचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांनी तासगाव तालुक्यातील येरळा पात्रात अचानक छापा टाकला. यावेळी 70 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. या वाळूचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.

अवैध वाळू उपसा व वाहतूक तसेच साठा करणाऱयांच्यावर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी फास आवळण्यास सुरूवात केली आहे. रविवार 3 सप्टेंबर रोजी त्यांनी स्वतः कडेगाव तालुक्यांतील वांगी येथे अचानक छापे टाकत मोठा वाळू साठा जप्त केला होता. त्यानंतर महसूलची सर्व यंत्रणा त्यांनी वाळू तस्करांच्या पाठीमागे लावली होती. दोन तस्करांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईही त्यांनी केली आहे. वाळू तस्करी होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले होते. सोमवारी सकाळी एक निनावी फोन जिल्हाधिकाऱयांना आला. तासगाव तालुक्यात येरळा नदीच्या पात्रातून मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा व वाहतूक होत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. या तक्रारीची जिल्हाधिकाऱयांनी तत्काळ दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगूण कुलकर्णी व महसूलचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांना कारवाई करण्याचे आदेश् ा दिले.

कुलकर्णी व कचरे यांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तासगाव तालुक्यातील जुना येळावी रस्त्यावर येरळा नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन सुरु असल्याचे त्यांना दिसून आले. उत्खनन करण्यात आलेली वाळू त्यांनी जप्त केली. सुमारे 70 ब्रास इतकी ही वाळू आहे. या वाळूचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी महसूल विभागाला दिले आहेत. विशेष म्हणजे ही कारवाई करण्यापूर्वी अतंत्य गोपनीयता ठेवण्यात आली होती. दरम्यान या ठिकाणी वारंवार वाळू उत्खनन होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात आली आहे.

महसूलच्या कर्मचाऱयांचा आशीर्वाद

जिल्हाधिकाऱयांनी वाळू तस्करांच्या विरोधात मोहीम उघडली असली तरी महसूलच्या अधिकाऱयांच्याकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. चिरीमिरीला सोकावलेल्या अधिकारी व कर्मचाऱयांनी जिल्हाधिकाऱयांचे आदेश बासनात गुंडाळून ठेवल्यानेच मोठी कारवाई होऊनही वाळू तस्करी सुरुच असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांच्यामधून सुरु होती. त्यामुळे वाळू तस्करांचा बिमोड करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जिल्हाधिकाऱयांना त्यांच्याच विभागातील झारीतील
शुक्राचार्यांचाही बंदोबस्त करावा लागणार आहे.

Related posts: