|Monday, August 26, 2019
You are here: Home » भविष्य » सर्वांगीण प्रगतीसाठी नवरात्रीचा कुलाचार अवश्य पाळा

सर्वांगीण प्रगतीसाठी नवरात्रीचा कुलाचार अवश्य पाळा 

पूर्वार्ध

बुध. दि. 20 ते  26 सप्टेंबर 2017

उद्या गुरुवारपासून नवरात्रीला सुरुवात होईल. नवरात्र म्हणजे 9 दिवस व 9 रात्री असा अर्थ नाही तर आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचे घराण्यातील कुलाचार असा अर्थ आहे. नवरात्रात कुलदेवाचे कुलाचार करावेतच पण या काळात देवीपूजेला विशेष महत्त्व आहे. नवरात्रातील देवी पूजन हे सर्वश्रे÷ मानलेले आहे. या काळात सर्व देवदेवता आपल्या सर्व आयुध व शक्तीनिशी पृथ्वीतलावर अदृश्यरुपाने अवतरतात. शास्त्राsक्त पूजा करून त्यांचे स्वागत केल्यास देवदेवता प्रसन्न होऊन समृद्धीचा आशीर्वाद प्रदान करतात. नवरात्रात देवापुढे  अखंड दिवा ठेवण्याची प्रथा आहे. काहीवेळा दिव्याला काजळी धरून दिवा विझण्याची शक्मयता असते त्याला कोणताही दोष नसतो पण नवरात्रात दिवा शांत होणे हे काहीजणांना अपशकुनासारखे वाटते त्यासाठी नंदादिप अखंड रहावा यासाठी दोन दिवे देवासमोर लावावेत म्हणजे चुकून एखादा दिवा विझला तरी दुसरा तेवत राहील. नवरात्रात दिव्याला अतिशय महत्त्व आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे लोखंड व शिसे सोडून कोणत्याही धातुचे दिवे लावता येतात. ऐरावताप्रमाणे श्रीमंती यावी यासाठी सोन्याचे दिवे लावून देवपूजन करावे असे शास्त्रात लिहिलेले आहे पण ते कुणालाही शक्य नाही त्यासाठी चांदी व पितळेचे दिवे लावले जातात. पण सर्व तऱहेने कल्याण व्हावे दैवी कृपा लाभावी यासाठी तांब्याचे दिवे लावावेत तांबे हे देवाना अतिशय प्रिय त्यामुळे देवपूजेसाठी तांब्याच्या वस्तुंना प्रथम प्राधान्य दिले जाते. तांब्याचे दिवे सहसा कोठेही मिळत नाहीत जर कोठे मिळत असतील तर जरुर ते देवापुढे लावा. जादुची कांडी फिरल्यासारखा अनुभव येईल पण तांब्याच्या दिवाच्या पथ्ये अतिशय कडक आहेत. घरात जर शिवाशिव पाळली जात नसेल व्यसने असतील अथवा मांसाहार असेल तांब्याचे दिवे न लावणेच चांगले. ताम्रदिपाने घराण्यातील अनेक मोठे दोष नष्ट होतात समृद्धी येते पण त्याची पथ्ये न पाळल्यास त्रासही होऊ शकतात काही व्यावहारिक अडचणीमुळे नवरात्रात  अनेकजणांना इच्छा असूनही घराण्यातील कुलाचार पाळता येत नाहीत पण हे कुलाचार सोडता येत नाहीत. अन्यथा पुढील जीवनात त्याचा त्रास होण्याची शक्मयता असते त्यासाठी नवरात्रातील महाष्टमीला देवी पूजन अवश्य करावे. या दिवशी कोटय़वधी योगिनीसह महालक्ष्मी भूतलावर अदृश्यरुपाने अवतरते या महालक्ष्मीचे पूजन या अष्टमीला केल्यास घराण्यात कायम समृद्धी नांदते लक्ष्मीला अभिषेक कुंकुंमार्चन पूजा अर्चा दुर्गासप्तशतीचे पाठ श्रीसुक्त हवन महाष्टमीच्या निमित्ताने उपवास लक्ष्मीस्तोत्र वाचन यापैकी जे जमेल ते या अष्टमीला करावे. लक्ष्मीचा आशीर्वाद लाभण्याचा हा राजमार्ग आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजेला जे महत्त्व आहे त्याच्या हजारोपटीने अधिक महत्त्व या अष्टमीला आहे. दुर्गसप्तशती पाठ संस्कृतमध्ये आहे ते सर्वांना जमेलच असे नाही. त्यासाठी मराठी व कन्नडमध्ये असलेले देवी महात्म्य हे पुस्तक वाचले तरीही त्याचे फळ चांगले मिळते. अग्निकर्म व स्थंडीलकर्म जमत नसेल तर सहस्त्रनाम स्वाहाकार मंत्राने विशि÷ पद्धतीने साधा होत केला तरी ते लक्ष्मीची प्रसन्नता लाभते.

 

मेष

सर्वपित्री अमावास्येच्या प्रभावाने शारीरिक व मानसिक विकार बळावतील. मंगळ शुभ आहे. त्यामुळे धनप्राप्तीचे नवनवे मार्ग दिसतील. कोणत्याही मार्गाने लक्ष्मी प्रसन्न होण्याची शक्मयता शनि गुरु योगामुळे कायमस्वरुपी मोठे काम पूर्ण कराल. प्रगतीच्या नवनव्या संधी येतील. वाहन जपून चालवा.

वृषभ

चतुर्थ व पंचमात होणाऱया सर्वपित्री अमावास्येचा परिणाम वास्तू  व कुटुंबावर जाणवेल.  वास्तू व पवित्र व शांत ठेवल्यास कोणताही त्रास होणार नाही. कमाई व खर्च यात ताळमेळ राहणार नाही. रवी गुरुचा सहयोग उत्तम त्यामुळे वास्तू, नोकरी व विवाहाच्या कामात चांगले यश. केतू, हर्षल नेपच्यूनमुळे विचित्र व्यक्तीशी गाठ पडेल.

मिथुन

अनेक कामे एकाचवेळी करण्याचा प्रयत्न कराल. पण ती पूर्ण होतीलच असे नाही. जागेचे व्यवहार असतील तर ते पूर्ण करून घ्या. गुरु, शुक्राचे उत्तम सहकार्य. त्यामुळे वैवाहिक सौख्यात वाढ. अर्थप्राप्ती चांगली. तसेच नाती गोती संबंध सुधारतील. प्रवास, लाभदायक ठरतील. अमावास्येदरम्यान आरोग्याची काळजी घ्या. शत्रुत्वाला प्रोत्साहन देऊ नका.

कर्क

पंचमस्थ शनिमुळे अनेक कामात अडथळे मुलाबाळाच्या वागण्यामुळे मनस्ताप. घरगुती सौख्यात बाधा. काहीतरी दुरुस्ती करायला जावून नको ते प्रसंग उदभवतील. शत्रुत्वात वाढ सर्वपित्री अमावास्येमुळे धनलाभात अडथळे व शेजाऱयांशी निष्कारण मतभेद व गैरसमज निर्माण होतील.

सिंह

 राशितच व धनस्थानी सर्वपित्री अमावास्या त्यामुळे कोणतेही आर्थिक व्यवहार जपून करावेत. प्रत्येक कामात विलंब जाणवेल. आमच्या कलागुणांना वाव देणारा महिना. त्यात पारंगत असाल तर नावलौकिक होण्याचे योग. मंगळामुळे वातावरण तप्त राहील. 19 व 20 दरम्यान सर्व बाबतीत जपून रहा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कन्या

सर्वपित्री अमावास्या मोक्ष स्थानी होत आहे. 19 व 20 या दोन दिवशी मन अस्वस्थ राहील. आरोग्याची काळजी घ्या. उच्च शुक्रामुळे अनेक बाबतीत मोठे यश, मोठे धनलाभ, नोकरी, उद्योग व्यवसायातील जुनी थकबाकी वसूल होईल. अनेक मार्गाने लक्ष्मीप्राप्तीचे योग. मनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल.

तुळ

अमावास्या शुभयोगात कशात काही नसताना मोठेपणा मिळण्याची संधी प्राप्त होईल. राशिस्वामी शुक्राचे मंगळासह पाठबळ चांगले. त्यामुळे सर्व कामात यश मिळेल. प्रवासात लाभ, नव्या ओळखी, एखादी जीवाला जीव देणारी व्यक्ती भेटेल.  सर्वपित्री अमावास्येदरम्यान बाधिक पीडेपासून जपा. घरदार स्वच्छ व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा. अपघात व दुर्घटनेत गेलेल्या व्यक्तीची बाधा होण्याची शक्मयता.

वृश्चिक

सर्वपित्री अमावास्या दशमात व लाभात होत आहे. श्राद्धकर्म व्यवस्थित असेल तर पितरांच्या कृपेमुळे मोठे यश मिळवाल. शारीरिक आरोग्य सांभाळा. पैसा बऱयापैकी मिळेल. पण खर्चिक स्वभावामुळे हाती पैसा टिकेल याची खात्री नाही. एखाद्या कार्यासाठी ठेवलेला पैसा दुसऱयाच कामासाठी खर्च होईल. त्यासाठी विचारपूर्वक कामाची आखणी करा म्हणजे खर्च आटोक्मयात राहील.

धनु

भाग्यात व दशमात सर्वपित्री अमावास्या होत आहे. त्यामुळे 19 व 20 या दोन  दिवशी नोकरी व्यवसायात कामाचा ताण वाढेल. स्वभावात एक प्रकारची अस्वस्थता राहील. आर्थिक बाबतीत अतिशय भाग्यवान ठराल. जे काम हाती घ्याल. त्यात चांगले यश मिळेल कौटुंबिक मतभेदांना थारा देऊ नका.

मकर

सर्वपित्री अमावास्या काही बाबतीत अत्यंत शुभ आहे. मनासारखी कामे होतील. पण वाहनअपघात, गैरसमज, मोठे खर्च, कामात अडथळे असे प्रकार घडतील. कुटुंबात जर पूर्वार्जित दोष असतील तर या अमावास्येला त्यांची विधीयुक्त निरसन करून घ्या. त्यामुळे बऱयाच अडचणी कमी होतील. कौटुंबिक सुख लाभेल.

कुंभ

 मंगळ, बुध, शुक्र व चंद्र शुभ योगात अनेक कामात चांगले यश देईल. धनलाभ मनासारखे होतील. शारीरिक, आरोग्य सुधारेल जे काम हाती घ्याल ते यशस्वी कराल. घरगुती समस्या मिटतील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण पण मोबाईलमुळे गैरसमजाला वाव मिळेल.

मीन

मंगळ, शुक्राचा योग रंगेल व रसिकपणा वाढविल. सर्वपित्री अमावास्या शत्रुस्थानी व सप्तमात होत आहे. श्रीमंती देणारे ग्रहयोग पण ही लक्ष्मी फक्त कष्टाच्या कामातून येईल. घरात नवखे पाहुणे येतील. त्यांच्यामुळे घराण्यातील अनेक महत्त्वाच्या गुप्त व दडून राहिलेल्या समाजातील अमावास्येदरम्यान महत्त्वाचे व्यवहार जपून करावेत.

.