|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चेनस्नॅचिंग करणाऱया जोडगोळीला अटक

चेनस्नॅचिंग करणाऱया जोडगोळीला अटक 

प्रतिनिधी / बेळगाव

हासन व चिक्कमंगळूर जिह्यात चेन स्नॅचिंग करणाऱया दोन तरुणांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. बेलूर, हळेबीडूसह अनेक ठिकाणी या जोडगोळीने चेन स्नॅचिंग केली असून त्यांच्या जवळून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सलमान उर्फ बोंडा अनसर पाशा (वय 20), महम्मद रोशन उर्फ तोंडा मन्वर पाशा (वय 20, दोघेही रा. हासन) अशी त्यांची नावे आहेत. कोतवाल गल्ली येथे या जोडगोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्या जवळून साडेसहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा दागिना जप्त करण्यात आला आहे.

सलमान व महम्मद रोशनविरुद्ध भा.दं.वि. 41 (1)(डी) सहकलम 102, 379, 411 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक अरुण नागेगौडा व त्यांच्या सहकाऱयांनी त्यांना अटक केली. हे दोघे कोतवाल गल्ली परिसरात संशयास्पदरीत्या फिरत होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली.

सलमान व महम्मद रोशन यांना बेळगावात अटक झाली असली तरी त्यांनी बेळगावात गुन्हे केले नाहीत. बेलूर, हळेबीडू या हासन जिह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये चेन स्नॅचिंग करीत होते. चिक्कमंगळूर जिह्यातही त्यांनी गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. 

Related posts: