|Sunday, March 29, 2020
You are here: Home » उद्योग » चहा निर्यातीत 4.58 टक्क्यांची वृद्धी

चहा निर्यातीत 4.58 टक्क्यांची वृद्धी 

कोलकाता/ वृत्तसंस्था :

भारतीय चहा बोर्डाकडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार वर्ष 2017 च्या पहिल्या सात महिन्यांतील चहा निर्यात 4.58 टक्क्यांनी वाढत 1,211.30 लक्ष किलोवर पोहोचली आहे. गतवर्षी या कालावधीत  1,158.30 किलो चहा निर्यात करण्यात आला होता.

 जानेवारी ते जुलाई या कालावधीत 2,363.22 कोटी रुपयांचा चहा निर्यात करण्यात आला. गत साली याच कालावधीत हा आकडा 2,260.07 कोटी रुपये इतका होता. चहा बोर्डानुसार या सात महिन्यात श्रीलंकेला होणारी चहा निर्यात 98.23 टक्क्यांची वाढ नोंदवत 22.60 लक्ष किलोवरून 44.80 लक्ष किलोवर पोहोचली आहे. याबरोबरच चीनला होणारी निर्यात 71 टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत चीनला 41.90 लक्ष किलो चहाची विक्री करण्यात आली. तर इजिप्तला 25 लक्ष किलो चहा पाठविण्यात आला. भारताने गत सात महिन्यांत ईराणला 125.20 लक्ष किलो तर संयुक्त अरब अमीरातला 100.10 लक्ष चहाची निर्यात केली.

 

 

 

 

Related posts: