|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » डिंपल यादव यापुढे निवडणूक लढवणार नाही

डिंपल यादव यापुढे निवडणूक लढवणार नाही 

ऑनलाईन टीम / लखनऊ :

समाजवादी पक्षाचे अध्यक्षा अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यापुढे कधीच निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा खुद्द अखिलेश यादव यांनी केली आहे.

डिंपल यादव उत्तर प्रदेशातील कन्नौजमधून लोकसभेच्या खासदार आहेत. सलग दुसऱयांदा त्या या मतदारक्षेत्रातून निवडून आल्या आहेत. पहिल्यांदा त्यांनी फिरोजाबदमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र काँग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज बब्बर यांच्याकडून डिंपल यांचा पराभाव झाला होता. ‘आमच्याकडे कोणतीही घराणेशाही नाही.मात्र तुम्हाला जर असे वाटत असेल, तर यापुढे माझी पत्नी डिंपल यादव कधीच निवडणूक लढवणार नाही’अशी घोषणा अखिलेश यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली.

 

Related posts: