|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » विविधा » मोबाईलचा ‘हा’नंबर बदलण्याचा प्रयत्न केल्यास तीन वर्षांचा तुरूंगवास

मोबाईलचा ‘हा’नंबर बदलण्याचा प्रयत्न केल्यास तीन वर्षांचा तुरूंगवास 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मोबाईलच्या आयएमईआय नंबर चोरण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न केल्यास तसेच बनावट आयएमईआय नंबर तयार करण्याचा प्रयत्न केल्यास तीन वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

प्रत्येक मोबाईलसाठी दिला जाणारा त्याचा 15 अकडी ओळख क्रमांक, अर्थात इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेन्टिटी क्रमांक ही त्या प्रत्येक हँडसेटची ओळख असते. दूरसंचार विभागाने 25 ऑगस्ट रोजी याबाबत अधिसूचना जारी केली होती. या निर्णयामुळे खोटे आयएमईआय नंबर आणि हरवलेले फोन पुन्हा शोधण्यात मदत होईल असा सरकारला विश्वास आहे.

कोणत्याही मोबाइलच्या आयएमईआय नंबरसोबत जाणूनबुजून छेडछाड करणे किंवा तो नंबर बदलने गुन्हा ठरणार आहे. नव्या नियमाला छेडछाड विरोधक नियम 2017असे नाव देण्यात आले आहे. सरकारने यासाठी ‘दि प्रिव्हेन्शन ऑफ टॅम्परिंग ऑफ दी मोबाई डिव्हाईस इक्विपमेंट आयडेन्टिपिकेशन नंबर रूल्स 2017 हा नवा नियमा तयार केला आहे. याशिवाय हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या कोणत्याही मोबाईलच्या सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या फोनचे सिम कार्ड किंवा आयएमर्अआय नंबर बदलला तरीही सेवा बंद केली जाईल दुरसंचार विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.