|Friday, November 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » सर्वाधिक लठ्ठ महिलेचे अबुधाबीत निधन

सर्वाधिक लठ्ठ महिलेचे अबुधाबीत निधन 

इमानवर मुंबईत झाले होते उपचार

अबुधाबी 

 जगातील सर्वाधिक स्थूल महिला इमान अहमद अब्दुलातीचे सोमवारी सकाळी अबुधाबीच्या एका रुग्णालयात निधन झाले. तिला बेरियाट्रिक शस्त्रक्रियेसाठी फेब्रुवारी महिन्यात इजिप्तमधून मुंबईत आणले गेले होते. मुंबईच्या सैफी रुग्णालयात जवळपास दोन महिन्यांपर्यंत तिच्यावर उपचार झाले. यानंतर पुढील उपचाराकरता कुटुंबीयांनी तिला संयुक्त अरब अमिरातमध्ये हलविले होते.

बेरियाट्रिक शल्यविशारद मुज्जफल लकडावाला यांच्यानुसार इमानचे निधन मूत्रपिंड निकामी होणे आणि फुफ्फुसांमध्ये जखमा झाल्याने झाले. ब्रुजील हॉस्पिटलच्या (अबुधाबी) डॉक्टर नाहिद हालवा यांनी इमानचा मृत्यू सोमवारी सकाळी 4.35 वाजता झाल्याची माहिती दिली.

अबुधाबीत 20 डॉक्टरांचे पथक तिच्यावर उपचार करत होते. रविवारी इमानच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले. त्याचबरोबर शरीराच्या अनेक भागात संसर्ग पसरला. प्रकृती अधिक बिघडल्याने तिला अतिदक्षता विभागात हलवावे लागले होते.

इमान फेब्रुवारी 2017 मध्ये इजिप्तमधून मुंबईत दाखल झाली होती. त्यावेळी तिचे वजन 500 किलोग्रॅमपेक्षाही अधिक होते, यानंतर मुंबईच्या सैफी रुग्णालयात इमानवर पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर एक महिन्यातच तिचे वजन 250 किलोंनी कमी झाले. 2 महिन्यांच्या उपचारानंतर तिचे वजक 327 किलोंनी कमी होत 173 किलोंवर आले, तरीही तिच्या कुटुंबीयांनी तिला मुंबईवरून अबुधाबीत हलविले असे सैफी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

Related posts: