|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कार्ती चिदंबरम यांना ‘ईडी’चा दणका

कार्ती चिदंबरम यांना ‘ईडी’चा दणका 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर एअरसेल-मॅक्सिस घोटाळाप्रकरणी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई केली. त्यांची 90 लाखांची संपती जप्त केली. तसेच बँक खाती आणि 26 लाख रुपयांच्या मुदतठेवीवरही टाच आणली आहे. कार्ती चिदंबरम यांना आपली संपत्ती विकण्याचा आणि बँक खाती बंद करण्याचा प्रयत्न केल्याने ही कारवाई केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात 3,500 कोटी रुपयांच्या विदेशी गुंतवणुकीसाठी मंजुरी दिली होती. यावेळी तत्कालिन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी 180 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत चुकीची माहिती दिल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे ईडीने
प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे. याप्रकरणी त्यांची सीबीआय चौकशीही झाली आहे. सीबीआय चौकशी हे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप पी. चिदंबरम यांनी केला होता. तसेच मी अर्थमंत्री असतानाचा आर्थिक व्यवहार आहे. त्यामुळे माझी चौकशी करा, असे आव्हानही त्यांनी केंद्र सरकारला दिले होते.