|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू : बिपीन रावत

गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू : बिपीन रावत 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पाकिस्तानच्या सीमेवरील नापाक कारवाया सुरूच राहिल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राई करू, असा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला दिला आहे. ‘पाकिस्तानला योग्य तो संदेश देण्यासाठी गेल्या वर्षी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता.मात्र पाकिस्तानने सीमेवरील कुरापती कमी न केल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल, असे रावत यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील कारवाया कमी न झाल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल. मात्र अशा प्रकाराची लष्कर कावाई करण्यासाठी इतरही मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळेच पुन्हा गेल्या वर्षीसारखीच कारवाई केली जाण्याची शक्यता नाही’असे लष्करप्रमुखांनी म्हटले. यावेळी त्यांना पाकिस्तानकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरीचे प्रयत्न याबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना दहशतवाद्यांना येत राहू दे, त्या सगळय़ांना जमिनीत गाडू असे ते म्हणाले.

 

Related posts: