|Monday, February 17, 2020
You are here: Home » क्रिडा » महिला कर्णधार मिथाली राजवरही लवकरच चरित्रपट

महिला कर्णधार मिथाली राजवरही लवकरच चरित्रपट 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारुन देणाऱया कर्णधार मिथाली राजवर देखील लवकरच चरित्रपट साकारला जाणार आहे. व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्सने याचे प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. यापूर्वी, सायना नेहवाल व कपिलदेव यांच्यावर चरित्रपट साकारले जाणार असल्याचे  जाहीर केले गेले होते. त्या यादीत आता मिथाली राजचा देखील समावेश झाला आहे.

यापूर्वी आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीत भारताला इंग्लंडकडून 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पण, तरीही मिथाली राजची कामगिरी नजरेत भरली होती. 34 वर्षीय मिथालीने 1999 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी क्रिकेट पदार्पण केले. तत्पूर्वी, 14 व्या वर्षीच 1997 च्या संभाव्य विश्वचषक संघात तिचा समावेश होता. पण, अंतिम 11 खेळाडूत तिला संधी मिळाली नव्हती. नंतर आयर्लंडविरुद्ध वयाच्या 16 व्या वर्षातच मिथालीने कारकिर्दीतील पहिले शतक साजरे केले. त्यानंतर तिला सातत्याने महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर, असे ओळखले जाऊ लागले. वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार धावा जमवणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू देखील ठरली. स्वतः मिथालीने या आगामी चरित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Related posts: