|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शिवसेनेकडून बाबू कवळेकरांचा निषेध

शिवसेनेकडून बाबू कवळेकरांचा निषेध 

प्रतिनिधी/ पणजी

 विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर हे सध्या जमीन घोटाळा प्रकरणी व मटका जुगार या प्रकरणात सापडले असल्याने त्यांनी अजून आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. याला विरोध म्हणून काल शिवसेना पक्षातर्फे बाबू कवळेकर व कांग्रेस पक्षाचा आझाद मैदानावर निषेध करण्यात आला. बाबू कवळेकरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा  यासाठी शिवसैनिक राजभवनवर जाऊन राज्यपालांना निवेदन देणार आहे, असे यावेळी शिवसेनेचे राज्य प्रमुख शिवप्रसाद जोशी यांनी सांगितले.

बाबु कवळेकर यांना विरोधी नेता या पदावर राहण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यांच्यावर सध्या जे आरोप होते आहे याची कॉंग्रेसने दखल घेतेली पाहीजे. त्यांना या पदावरुन हटवून अन्य नेत्याची नेमणूक करावी. बाबू कवळेकर सध्या जमीन घोटाळा प्रकरणी व माटका जुगार प्रकरणात अडकले आहे. त्यांच्यावर चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाची सुत्रे दुसऱयाकडे द्यावी, असे यावेळी राखी नाईक यांनी सांगितले.

 कॉंग्रेस पक्ष सध्या नामशेष झाला आहे. राज्यात बळकट असा विरोधी पक्ष नाही त्यामुळे लोकांच्या समस्या तशाच पडून आहे. भाजप सरकार त्याचा फायदा उठवत आहे. कॉंगेसने जर कठोर विरोधी पक्षाची भुमिका घ्यायची असेल तर त्यांनी अगोदर विरोधी पक्ष नेत्याची त्या पदावरुन हकालपट्टी करावी व लोकांना न्याय मिळवून द्यावा, असे यावेळी शिवप्रसाद जोशी म्हणाले. यावेळी शिसेनेचे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणत उपस्थित होते.

Related posts: