|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » विविधा » औरंगाबादमध्ये बिर्याणीत कुत्र्याचे मांस ?

औरंगाबादमध्ये बिर्याणीत कुत्र्याचे मांस ? 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

रस्त्यावर स्वस्तात तुम्ही खात असलेली बिर्याणी ही चिकन किंवा मटनची नसून ती कुत्र्याची असू शकते. त्यामुळे तुम्ही जर रस्त्यावर बिर्याणी खात असाल तर सावधान. औरंगाबदमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी कुत्र्यांचे कापलेले शीर सापडत आहेत आणि हे बिर्याणीत कुत्र्यांचे मांस वापरल्यामुळे होत असल्याचे वास्तव ऍनिमल वेलफेअर मंडळाच्या सदस्यांनी समोर आणले आहे.

औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी नाल्यात किंवा कचऱया त कुत्र्यांचे कापलेले शीर आढळून येत आहेत. मात्र त्याचे धड आढळून येत नाही. रस्त्यावर मिळणाऱया स्वस्त बिर्याणीत कुत्र्यांचे मांस वापरले जात असल्याने हे प्रकार होत असल्याचे धक्कादायक वास्तव अधिकाऱयांनी समोर आणल आहे. स्वस्तात बिर्याणी विकत असताना असे प्रकार होत आहेत. यात कुत्र्यांसोबत मांजरीचेही मांस वापरले जात असल्याचा दावा अधिकाऱयांनी दिला आहे. बिर्याणीत जर कुत्र्याचे मास मिश्रण पेले असेल तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे सर्वसामन्यांचा जीव जाण्याची देखील शक्यता असल्याचे ऍनिमल वेलफेअर मंडळाच्या सदस्यांचे मत आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये नागरिकांच्या आरौग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.