|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » इन्सुलीतील तरुणाचे मुंबईत कोकण छायाचित्र प्रदर्शन

इन्सुलीतील तरुणाचे मुंबईत कोकण छायाचित्र प्रदर्शन 

प्रदर्शनातील छायाचित्रातून होतो कोकणचा आभास

प्रतिनिधी / बांदा :

इन्सुली येथील तरुण प्रल्हाद भाटकर याने छायाचित्र प्रदर्शनातून मुंबईत कोकण उभा केला आहे. हे चित्रप्रदर्शन पाहणाऱया प्रत्येकाला क्षणभर आपण कोकणात असल्याचा भास होत आहे. कोकणातील गणेशोत्सव, निसर्ग, पावसाळा, उन्हाळा, शिमगोत्सव, नदी, जत्रोत्सव, दशावतार, फुगडय़ा, रेंबाट, समुद्र, डोंगरातून वाट काढणारे रस्ते आदींची छायाचित्रे या प्रदर्शनात आहेत. केवळ कोकणी जनताच  नव्हे तर इतर प्रांतातील जनता या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन कोकणचे सौंदर्य छायाचित्राच्या माध्यमातून डोळय़ात साठवून ठेवत आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यालय योगक्षेम-नरिमन पॉईन्ट मुंबई येथे हे प्रदर्शन सुरू आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. कोकणातील निसर्ग पर्यटकांना भुरळ घालणारा आहे. या छायाचित्र प्रदर्शनाचा एकप्रकारे कोकणातील विशेष करून सिंधुदुर्गमधील पर्यटन वाढीसाठी उपयोग होईल. हे प्रदर्शन भरविणारे प्रल्हाद भाटकर हे सावंतवाडीतील आहेत. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. कोकणातील ग्रामीण निसर्ग पर्यटनासाठी येणाऱया पर्यटकांना भुरळ घालतो. ग्रामीण पर्यटनवाढीसाठी आम्ही नेहमी शासनस्तरावर प्रयत्न करतो. मात्र, भाटकर यांनी या ठिकाणी प्रदर्शन भरवून कोकणातील छायाचित्ररुपी निसर्गाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यातील छायाचित्र पाहणाऱया प्रत्येकाला कोणात यावेसे वाटेल आणि त्याचा उपयोग कोकणातील पर्यटनावाढीसाठी होईल, असे कौतुगोद्गार केसरकर यांनी काढले.

 यावेळी वरळीचे आमदार सुनील शिंदे, भारतीय विमा कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष गोपाळ शेलार, सरचिटणीस महेश लाड, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद भाटकर, अर्चना कदम, राजू चिंदरकर, रुपा भंडारी, नेहा दाणी, छाया कुमटा, सेरा भाटकर, सुजाता पाटील, वैशाली जन्हवले, यतीन आमोणेकर, श्रीधर पाथरे, श्याम पांचाळ आदींसह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन यतीन आमोणेकर यांनी केले.

 

 

 

 

 

 

Related posts: