|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » सर्व पक्षांचे निवडणूक चिन्हं रद्द करा ; अण्णा हजारेंची मागणी

सर्व पक्षांचे निवडणूक चिन्हं रद्द करा ; अण्णा हजारेंची मागणी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

निवडणूक लढताना पक्षांना राजकीय चिन्हांची गरज नाही, पक्षाच्या नावावर अनेक भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक निवडून येत असल्याने ही चिन्हं गायब करा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अण्णा हजारेंनी ही मागणी केली. अण्णांनी संपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचारविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर आता रालोआ सरकारच्या काळात अण्णांनी नवी मागणी केली. निवडणूक चिन्हं रद्द करावी. घटनेच्या कलम 84 मध्ये निवडणुकीसंदर्भातील नियम दिले आहेत. त्यामध्ये कोठेही चिन्हाचा उल्लेख नाही. त्यामुळे चिन्हांची ही पद्धतच घटनाबाह्य असल्याचा दावाही अण्णांनी केला. यासाठी निवडणूक आयोगाला आपण अनेकदा पत्रं लिहिली आहेत. तसेच जर गरज भासल्यास भविष्यात कोर्टाचे दारही ठोठावू, असा इशाराही अण्णांनी यावेळी दिला.