|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलिया हॉकी लीगमध्ये भारत अ पुरुष संघाची आगेकूच

ऑस्ट्रेलिया हॉकी लीगमध्ये भारत अ पुरुष संघाची आगेकूच 

वृत्तसंस्था/ पर्थ

भारत अ पुरुष हॉकी संघाने ऑस्ट्रेलिया हॉकी लीगमधील सामन्यात ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी संघावर 2-0 अशा गोलफरकाने विजय मिळवित पुढील फेरी गाठली. साखळी फेरीतील हा त्यांचा शेवटचा सामना होता.

अफान युसूफने पाचव्या तर अरमान कुरेशीने 46 व्या मिनिटाला भारत अ चे गोल नोंदवले. भारताने प्रारंभापासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन घडविल्याने पाचव्याच मिनिटाला अफान युसूफने शानदार मैदानी गोल नोंदवत पहिले यश मिळविले. पहिल्या दोन सत्रात भारतीय बचावफळीने आपली जबाबदारी चोख पार पडल्याने एसीटी संघाला संधी मिळू शकली नाही. एसीटीने पहिल्या तीन सत्रात अनेक संधी वाया घालविल्या. त्याचा फायदा भारत अ ने उठविला. चौथ्या सत्राच्या सुरुवातीला पासेसचे मनोरंजक  दर्शन घडविले आणि 46 व्य मिनिटाला अरमानने संघाचा दुसरा मैदानी गोल नोंदवत आघाडी वाढविली. एसीटीने पुनरागमन करण्याची खूप धडपड केली. पण भारत अ ची भक्कम बचावफळी त्यांना भेदता आली नाही. या विजयानंतर भारत अ संघाने पुढील फेरी गाठली असून जेतेपद मिळविण्याची त्यांना चांगली संधी आहे. साखळी फेरीत भारत अ ने गट ब मधील चार सामन्यांत 2 विजय, 1 पराभव व एक बरोबरी साधत एकूण 7 गुण मिळविले.