|Monday, January 20, 2020
You are here: Home » क्रिडा » भारत ‘अ’ महिला हॉकी संघ विजयी

भारत ‘अ’ महिला हॉकी संघ विजयी 

वृत्तसंस्था / पर्थ

मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या 2017 च्या ऑस्ट्रेलियन हॉकी लीग महिलांच्या स्पर्धेत भारत अ महिला हॉकी संघाने विजयी सलामी दिली. या सामन्यात भारत अ महिला संघाने टास्मानियाचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला.

हा सामना शेवटपर्यंत चुरशीचा झाला. भारतातर्फे एकमेव विजयी गोल संगीताकुमारीने 19 व्या मिनिटाला नोंदविला. त्यानंतर टास्मानियाच्या खेळाडूंनी गोल करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना शेवटपर्यंत यश आले नाही. आता भारत अ महिला हॉकी संघ या विजयामुळे पुढील फेरीत दाखल झाला असून त्यांचा पुढील सामना येत्या गुरूवारी पश्चिम ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध होणार आहे. ब गटात भारत संघ आता तीन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

Related posts: