|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » असा करा फोनच्या Volume Keyचा वापर

असा करा फोनच्या Volume Keyचा वापर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आज आम्ही आपणाला मोबाईल फोनच्या Volume बटनबाबत माहिती देणार आहोत. Volume बटनाचा वापर हा फक्त आवाज कमी-जास्त करण्यासाठी करत असतो. मात्र, याव्यतिरिक्तही Volume बटनाचा वापर करता येऊ शकतो. याची माहिती आपण घेऊ.

Volume बटनाद्वारे फोनचे ब्राइटनेस वाढवणे, फ्लॅश लाइट चालू करणे, साऊंड प्ले आणि पॉज, स्क्रीन टर्न ऑफसारखे इतर कामे करता येऊ शकतात. यासाठी युजर्सला गुगल प्ले स्टोअरवरुन Button Mapper हे फ्री ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. याचा वापर करणेही अगदी सोपे आहे.

– ही आहे प्रोसेस –

– प्ले स्टोअरवरुन Button Mapper हे ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. हे ऍप install केल्यानंतर दोन ते तीन परमिशन्स Allow केल्यानंतर ऍप ओपन होईल. Accesibilty ऑन करणे गरजेचे आहे.

– Volume Up, Volume Down ऑप्शनमध्ये एकवर टॅप करुन आलेले ऑप्शनस् सिलेक्ट करावे. त्यानतंर आलेले कोणतेही बटन सिलेक्ट करावे. हे केल्यानंतर Volume Up, Volume Down ची बटनं काम करतील