|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » छत्तीसगडच्या तरुणी ‘टनाटन’ ; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

छत्तीसगडच्या तरुणी ‘टनाटन’ ; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य 

ऑनलाईन टीम / रायपूर :

राज्याचे क्रीडामंत्री भैय्यालाल रजवाडे मला नेहमी सांगतात, आता मुंबई आणि कोलकातामधील तरुणींची गरज राहिलेली नाही. कोरबा आणि छत्तीसगडच्या तरुणी एकदम ‘टनाटन’ होऊ लागल्या आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार बन्सीलाल महतो यांनी केले.

गांधी जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. आता मुंबई आणि कोलकातामधील तरुणींची गरज राहिलेली नाही. कोरबा आणि छत्तीसगडच्या तरुणी एकदम ‘टनाटन’ होऊ लागल्या आहेत, असे रजवाडे यांनी मला सांगितल्याचे महतो यांनी सांगितले. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. दरम्यान, रजवाडे यांनी सांगितले, खासदार साहेबांनी माझे एक वाक्य उचलून त्याचा वेगळा संदर्भ लावत सर्वांसमोर मांडले.

Related posts: