|Thursday, November 21, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Airtel कडून दररोज मिळणार 3GB 4G Data

Airtel कडून दररोज मिळणार 3GB 4G Data 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेल इंडियाने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवा प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन 799 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला असून, या प्लॅनअंतर्गत दररोज 3 जीबी 4 जी डाटा मिळणार आहे.

या नव्या पॅकच्या माध्यमातून अनलिमिटेड एसटीडी आणि लोकल फोन कॉलची सुविधा मिळणार आहे. मात्र, कंपनीकडून याच्या अटी आणि शर्थीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. अनलिमिटेड कॉल सुविधा ही एका मर्यादित कालावधीसाठी देण्यात येणार आहे. प्रतिदिन 250 मिनिटे मोफत कॉल आणि 1 हजार मिनिटांची मर्यादा आठवडय़ाभरासाठी देण्यात येणार आहे. या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी 799 रुपयांचे रिचार्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Related posts: