|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तान्हीला कडेवर घेऊन बिद्रीच्या रणांगणात

तान्हीला कडेवर घेऊन बिद्रीच्या रणांगणात 

प्रतिनिधी/ सेनापती कापशी 

कागल तालुका हा राजकारणाचे विद्यापीठ आहे. येथील निवडणुका मोठय़ा इर्षेने होतात. सेवा संस्थेच्या निवडणुकीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत हा संघर्ष पहावयास मिळतो. उमेदवारी करण्यासाठीही कार्यकर्ते तेवढय़ाच ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरतात. बिद्री साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि कुरुकलीच्या सौ. अर्चना विकास पाटील यांना राष्ट्रवादीकडून महिला               प्रतिनिधी गटातून उमेदवारी मिळाली आहे. त्या आपल्या तान्हीला कडेवर घेऊन मतदारांच्या गाठीभेटीत त्या मग्न आहेत.

बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत कुरुकलीच्या विकास पाटील व त्यांच्या पत्नी सौ. अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विकास पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही मात्र त्यांच्या पत्नी सौ. अर्चना पाटील यांना महिला गटातून उमेदवारी जाहीर झाली. प्रचाराची रणधुमाळी अंतीम टप्यात असून सौ. पाटील यांनी सर्व मतदारांपर्यंत जाताना आपल्या आठ-नऊ महिन्याच्या तान्हीला कडेवर घेऊन प्रचारात रान उठवले आहे.

सौ. अर्चना पाटील या फेब्रुवारीमध्ये झालेल्या जि. प. च्या निवडणुकीतही नानीबाई चिखली जि. प. मतदारसंघातून लढल्या होत्या. त्यांनी निकराची झुंज देताना अवघ्या 1593 मतांनी पराभूत झाल्या. त्यावेळी त्यांची तान्हुली अवघ्या  दोन महिन्यांची होती. असे असतानाही आपल्या नेत्यासाठी समोर बलाढय़ उमेदवार असतानाही त्या लढल्या. येथे त्यांचा पराभव झाल्याने हा डाग पुसून काढण्यासाठी पुन्हा त्यांना आमदार हसन मुश्रीफ यांनी बिद्रीच्या रणांगणात उतरवले आहे. जय-पराजयाची चिंता न करता त्या याही निवडणुकीत धैर्याने उतरल्या आहेत.

Related posts: