|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट

नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट 

ऑनलाईन टीम / नाशिक :

नाशिकमधील शरणपूर भागात महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी सकाळी स्फोट झाला. अवैधरित्या गॅस भरण्यासाठी केलेल्या सिलिंडरच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

ज्या गाळ्यामध्ये हा स्फोट झाला त्याचा मालक हा सिन्नर भागात राहणारा असून, आसपासच्या नागरिकांनी त्याला या घटनेची सर्वप्रथम माहिती दिली. तिबेटीयन मार्केटमध्ये झालेला हा स्फोट अवैधरित्या गॅस भरण्यासाठी केलेल्या सिलिंडरच्या गळतीमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ज्या गाळ्यात हा स्फोट झाला त्या ठिकाणी सिलिंडर आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related posts: