|Monday, September 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » लवकरच भेटीला येतोय देवा

लवकरच भेटीला येतोय देवा 

महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असणाऱया अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेला ‘देवा’ हा सिनेमा, येत्या 1 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा दसऱयाच्या मुहूर्तावर विविध रंगाने नटलेला मोशन पोस्टर लाँच करण्यात आला. इनोव्हेटिव्ह फिल्म्स निर्मित, या सिनेमात अंकुशने साकारलेल्या देवा या पात्राचे व्यक्तिमत्व देखील असेच रंगबेरंगी असून, प्रत्येकांच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम तो या सिनेमातून करणार आहे. दसऱयाच्या धामधुमीनंतर रात्री 12 वाजता या सिनेमाचा हा पहिला मोशन पोस्टर सोशल नेटवर्पिंग साईटवर प्रकाशित करण्यात आला. अशाप्रकारे मध्यरात्री सिनेमाचा टीझर मोशन पोस्टर लाँच करण्याची ही पहिलीच वेळ असून देवा सिनेमाच्या पूर्वप्रसिद्धीकरिता यासारख्या अनेक अतरंगी कल्पना सिनेमाच्या टीमकडून लढवल्या जाणार आहेत. देवाच्या हटके प्रसिद्धीमुळे कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा अतरंगी देवा नेमका कसा असेल? याची उत्सुकता लोकांना लागली आहे. मुरली नलप्पा दिग्दर्शित हा सिनेमा रसिकांच्या जीवनात रंग भरण्यास या वर्षाखेरीस येत आहे.