|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दुर्भाट रासई फेरीबोट चिखलात रूतली

दुर्भाट रासई फेरीबोट चिखलात रूतली 

प्रतिनिधी/ फोंडा

zदुर्भाट-रासई मार्गावरील फेरीबोट दुर्भाट धक्क्याजवळ चिखलात रूतल्याने त्यात प्रवासी व वाहने अडकून पडली. तब्बल दोन तासानंतर फेरीबोटीत अडकून पडलेल्या प्रवशांची सुटका करण्यात आली. काल रविवारी 4.30 वा. ही घटना घडली.

सदर फेरीबोट प्रवाशाना घेऊन दुर्भाटहून राईसकडे जात होती. प्राप्त माहितीनुसार फेरीचालकांने नदीला सुकती असतानाही धक्क्याजवळच फेरीबोट घेण्याचा प्रयत्न केल्याने ती चिखलात अडकल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. फेरीबोट अडकण्यामागे आणखी एक कारण म्हणजे दुर्भाटच्या धक्का विस्ताराचे काम संपल्यानंतर बांधकाम कंत्राटदाराने भरावासाठी वापरलेल्या मातीच्या पोथ्या धक्याजवळच सोडून दिलेल्या आहेत. यापैकी एक दोन पिशव्या फेरीबोटच्या पंख्याखाली अडकल्याने ही घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

यावेळी फेरीबोटमध्ये 20 ते 25 प्रवासी, तीन चारचाकी व 12 दुचाक्या होत्या. घटनेनंतर तब्बल दिड तासानंतर मदतकार्याला दुसरी फेरीबोट पोचली या फेरीतून काही पुरूष प्रवासी धक्याजवळ आले. प्रवाशामध्ये एक रूग्ण व काहि महिला होत्या. त्याना स्थानिक मच्छीमार लोकांनी आपल्या होडीतून बाहेर काढले.

चिखलात रूतलेली फेरीबोट बाहेर काढण्यास मदतीसाठी आलेल्या दुसऱया फेरीबोट कर्मचाऱयाना ते शक्य झाले नाही. वाहने बाहेर काढण्यासाठी नदीला भरती येईपर्यत थांबावे लागले होते.

 

Related posts: