|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » सप्टेंबरमध्ये वाहन विक्रीत वृद्धी

सप्टेंबरमध्ये वाहन विक्रीत वृद्धी 

नवी दिल्ली 

: सप्टेंबर महिन्यात प्रवासी वाहन विक्रीमध्ये 11.32 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 2,78,428 वाहनांची विक्री करण्यात आली होती. गेल्या महिन्यात यात वाढ होत 3,09,955 युनिट्सची विक्री झाली होती. कारच्या विक्रीमध्ये 6.86 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षीच्या 1,95,259 युनिट्सच्या तुलनेत ही विक्री 2,08,656 युनिट्सवर पोहोचल्याचे सियाम या संघटनेने म्हटले. मोटारसायकल विक्रीत 6.98 टक्क्यांनी वाढ होत 12,69,612 युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत 11,86,759 युनिट्सची विक्री झाली होती. सप्टेंबरमध्ये एकूण दुचाकी विक्री 9.05 टक्क्यांनी वाढत 20,41,024 युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी हा आकडा 18,71,621 युनिट्स होती. व्यावसायिक वाहनांची विक्री 25.27 टक्क्यांनी वाढत 77,195 वर पोहोचली आहे. एकूण वाहन विक्री 10 टक्क्यांनी वाढत 24,90,034 वर पोहोचली आहे. सप्टेंबर 2016 मध्ये हा आकडा 22,63,620 युनिट्स होता.

Related posts: