|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Automobiles » Carberry Double Barrel 1000 लाँच

Carberry Double Barrel 1000 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध कस्टमाइज कंपनी कारबेरीने भारतामध्ये आपली पहिली मेड इन इंडिया बाइक लाँच केली आहे. डबल बॅरल असे या बाइकचे नाव असून, या बाइकमध्ये रॉयल एनफिल्ड बाइकचे 1000 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे.

– असे असतील या बाइकचे फिचर्स –

– इंजिन – या नव्या बाइकमध्ये 55 डिग्री V-Twin इंजिन डय़ुअल कार्बोरेटर सेटअप देण्यात आले आहे. या इंजिनच्या माध्यमातून 53 पीएसचा पॉवर आणि 82 न्यूटन मीटरचा टार्क निर्माण करण्याची क्षमता यामध्ये असणार आहे.

– गिअरबॉक्स – 5 स्पीड गिअरबॉक्स

– क्लच – 7 प्लेट क्लच ऍसेंबली आणि मजबूत चेन ड्राइव्ह देण्यात आले आहे.

– ब्रेकिंग सिस्टिम – यामध्ये रिअर डिस्क ब्रेक आणि एबीएस अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आले आहे.

– बुकिंग – ही बाइक लाँच करण्यासाठी कंपनीला चार वर्षे लागली आहे. ही बाइक बुक करण्यासाठी एक लाख रुपयांचा टोकन अमाऊंट देऊन ही बाइक बुक करता येऊ शकते. तसेच या बाइकची डिलेव्हरी 5 ते 6 महिन्यांमध्ये सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

– किंमत – 7 लाख 37 हजार रुपये.

Related posts: