|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » बैलगाडा शर्यतीवरील बंदी उच्च न्यायालयाकडून कायम

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उच्च न्यायालयाकडून कायम 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दिवाळीच्या सणादरम्यान बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवावी, अशी मागणी करणारी राज्य सरकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. त्यामुळे राज्यात सर्वोच्च न्यायालयाने लावलेली बैलगाडा शर्यतीवरील बंदी उच्च न्यायालयाकडून कायम करण्यात आली आहे.

बैल हा कसरती दाखवण्याबाबत योग्य प्राणी नाही. तसेच बैल शर्यतीत धावण्यासाठी सक्षम प्राणी नाही. त्याची शारीरिक रचना तशी नाही. त्यामुळे बैलगाडी शर्यत म्हणजे क्रूरतेचे लक्षण आहे, असे मत न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांनी सर्वोच्च न्यायालयाने 2014 साली दिलेल्या जलिकट्टू या खेळासाठी दिलेल्या आदेशाकडेही लक्ष वेधले.

Related posts: