|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » आरुषि हत्या : तलवार दांपत्य निर्दोष

आरुषि हत्या : तलवार दांपत्य निर्दोष 

अलाहाबाद / वृत्तसंस्था :

अलाहाबाद उच्च न्यायालयाने 9 वर्षे जुन्या नोएडाच्या आरुषि-हेमराज हत्येच्या  खटल्यात तलवार दांपत्याला निर्दोष ठरविले. याप्रकरणी सीबीआय न्यायालयाने आरुषिचे आईवडिल राजेश आणि नूपुर तलवार यांना 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तेव्हापासून ते गाजियाबादच्या डासना तुरुंगात कैद आहेत. जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात तलवार दांपत्याने उच्च न्यायालयात दाद मागितली.

गुरुवारी याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.के. नारायण आणि ए.के. मिश्रा यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर तलवार दांपत्याला दोषी ठरविले जाऊ शकत नाही असे खंडपीठाने म्हटले.

काय आहे प्रकरण ?

16 मे 2008 रोजी नोएडाच्या जलवायू विहार येथील घरात 14 वर्षीय आरुषिची गळा चिरून हत्या करण्यात आली. जवळपास साडेपाच वर्षे चाललेली चौकशी आणि सुनावणीनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने नूपुर आणि राजेश तलवारला दोषी ठरविले. हे प्रकरण दीर्घकाळापर्यंत चर्चेत राहिले. आरुषिच्या मारेकऱयांना शिक्षा व्हावी यासाठी लोक रस्त्यावर उतरले. उत्तरप्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावतींनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयला सोपविली.

Related posts: