|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपा झोनवर वर्चस्वासाठी भाजपाचा एमआयएमवर गळ

मनपा झोनवर वर्चस्वासाठी भाजपाचा एमआयएमवर गळ 

प्रतिनिधी /सोलापूर :

आज होणाऱया सर्वसाधारण सभेत महापालिकेच्या आठ झोनच्या रचनेचा विषय असून प्रशासनाने पाठवलेल्या रचनेनुसार आठपैकी पाच झोनवर सत्ताधारी भाजपाचे निर्विवाद वर्चस्व तर एका झोनमध्ये समान बलाबल असून उर्वरित दोन झोनवर विरोधकांचे प्राबल्य आहे. वर्चस्व असलेले पाच झोन वगळता उर्वरित तीन झोनही ताब्यात घेण्यासाठी भाजपने रणणिती आखली असून एमआयएमवर गळ टाकल्याचे कळते. तर ऐनवेळी सभेत कोणत्याही विरोधी पक्षाला सोबत घेवून भाजप वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करेल. पण भाजमधील अंतर्गतवाद सभगृहात दिसल्यास विरोधकच पुन्हा बाजी मारण्याचीही शक्यता आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होणार आहे. या सभेत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावानुसार सर्व 8 झोनची रचना नव्याने होणार आहे. प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या 8 झोनच्या रचनेत पक्षीय बलाबल पाहता आठपैकी 1, 2, 3, 4, 6 या पाच झोनवर सत्ताधारी भाजपचे वर्चस्व आहे. तर झोन 5 मध्ये भाजप व विरोधी पक्षांचे समान पक्षीय बलाबल आहे. झोन 7 व 8 मध्ये भाजपचे वर्चस्व नाही. भाजपमधील अंतर्गत वादामुळे मागे विषय समितीच्या निवडणुकीत विरोधक एकत्र झाल्याने भाजपला पराभवाचा धक्का बसला होता. महत्वाच्या विषय समित्या विरोधकांच्या ताब्यात गेल्या होत्या.

आज होणाऱया सर्वसाधारण सभेत विरोधक पुन्हा एकत्र आल्यास सत्ताधारी भाजपला धक्का बसू शकतो. हे लक्षात घेवून सभगृहनेता सुरेश पाटील यांनी रणणिती आखली आहे. एमआयएम पक्षावर भाजपाने गळ टाकला असून एमआयमाएने भाजपला साथ दिल्यास भाजपाच्या ताब्यात आणखीन झोन येण्याची शक्यता आहे. पण भाजपाला सर्वच झोनवर वर्चस्व हवे असल्यास आणखी एका विरोधी पक्षाला गळाला लावावे लागणार आहे.

Related posts: