|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वीजेच्या कडकडाटासह पंढरीत मूसळधार

वीजेच्या कडकडाटासह पंढरीत मूसळधार 

पंढरपूर / वार्ताहर

येथे आज शहरासह तालूक्यात वीजेच्या कडकडाटासह मूसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसासह झालेल्या वीजेच्या कडकडाटामूळे नागरिकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तर मूसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे शहराच्या सखल भागात सर्वत्र गूडघाभर पाणी साचले होतें.

तसेच शहराच्या हद्यीत रेल्वेचे तीन पूल असून या पूलामूळे व चूकिच्या व्यवस्थेमूळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसत होते. यामूळे शहराच्या प्रमूख स्टेशन रोडवरच वाहतूकीची कोंडी झाल्याचे दिसत होते. यामूळे पोलिस प्रशासन देखील हतबल झाल्याचे दिसत होते. नागरिकांचे देखील प्रचंड हाल या पावसामूळे झाले.

शहरासह तालुक्यात हस्ताच्या पावसाने दमदार हजेरी लावत शहरवासिंयासह शेतक-यांनाही चांगलेच आश्चर्यचकित केले यामुळे सर्वांचीच धावपळ झाली शहराच्या सखल व तालुक्यात शेतक-यांच्या पिकांत पावसाचे पाणी साठल्याचे यावेळेस दिसुन आले. शूक्रवारी सायंकाळी 4 च्या दरम्यान पावसाने सुरूवात झाली आणि शहर व तालुक्यांला झोपडले. 

सायंकाळी 4 च्या दरम्यान पावसाने ढगांच्या गडगडासह सुरुवात केली होती.या दमदार पावसामुळे काही क्षणारार्धांत सगळीकडे पाणीच पाणी वाहु लागले होते. पंढरपुरातील तिनही रेल्वेपुलाखालील रस्त्याला नदीचे स्वरुप आले होते. यातुनच लोक जीव मुठीत धरुन वाट काढीत होते. रेल्वेपुलाखालुन जाताना काही वाहने बंद पडली होती. त्यामुळे वाहनधारकांना पंढरपूर नगरपालिका प्रशासनाच्या कामाच्या दिरंगाईमुळे रेल्वेपुलाखाली प्रत्येक पावसात पाणी साठत असुन यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करुन यामधुन आपली वाहने सुखरुप बाहेर काढावी लागत आहेत.

तालुक्यामध्येसुध्दा पावसाने ढगांच्या गडगडासह चांगलीच सरुवात केली आहे. .ब-याच गावामध्ये हस्ताच्या झालेल्या पावसाने पिकांमध्ये पाणी साचल्याचे दिसुन येत होते. यामुळे मोठया प्रमाणावर पिकांचे नुकसान देखील झाले आहे. यामुळे परतीच्या पावसामुळे आनंदित झालेला शेतकरी काल काहीसे चिंतित असल्याचे दिसत होते.

सध्या मान्सुन परतीच्या मार्गावर असुन या पावसाने शेतकरयांची पुढील दोन वर्षांची पाण्याची चिंता मिटवली आहे. गेल्या काही वर्षांपासुन पंढरपूर तालुक्यामध्ये सततचा दुष्काळ पडत होता. यामुळे सध्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठी लागणा-या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी वाढलेल्या परतीच्या मान्सुनमुळे आनंदासहित चिंताही वाढत असल्याचे बोलले जात आहे.

 

Related posts: