|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लाखाची लाच घेताना दोन कृषी अधिकारी रंगेहाथ

लाखाची लाच घेताना दोन कृषी अधिकारी रंगेहाथ 

पंढरपूर / प्रतिनिधी

सांगोला कृषी कार्यालयातील दोन कृषी अधिकारी शुक्रवारी दुपारी पंढरपुरात तीन वाजण्याच्या सुमारास 1 लाख रूपयाची लाच घेताना लाच लुचपतच्या जाळ्यात सापडले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रात्री उशीरापर्यत चौकशी आणि कारवाई सुरू होती.

याबाबत अधिक माहिती अशी, सांगोला कृषी कार्यालयातील कृषी साहाय्यक सुरेंद्रकुमार शिंदे आणि कृषी पर्यवेक्षक †िदलीप दत्तात्रय पंचवाडकर यांनी एका ठेकेदारास जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाल्याचा दाखला आणि अनामत रक्कम देण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी 4 लाख रूपये लाचेंची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शिंदे आणि पंचवाडकर यांच्या सुचनेनुसार पंढरपुरातील भाई राउळ पुतळयाजवळ या ठेकेदारास पैसे घेण्यासाठी बोलवण्यात आले. यामध्ये सुरूवातीला एक लाख रूपये देण्याचे ठरविण्यात आल्याचे समजते. 

त्यानुसार येथील स्टेशन रोडच्या भाई राउळ पुतळयाजवळ शिंदे आणि पंचवाडकर आले असताना, तक्रारदार यांनी एक लाख रूपये देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांना रंगेहाथ सापडले. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी या दोन लाचखोरांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. त्याच्यावर रात्री उशीरापर्यत कारवाई करण्याचे सत्र सुरू होते.

Related posts: