|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार 

सोमवारी मतदान, मंगळवारी मतमोजणी

प्रतिनिधी/ सांगली

गेल्या आठ दिवसांपासून गावागावात ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची आज सांगता होणार आहे. रविवारचा दिवस उमेदवारांसाठी खऱया अर्थाने मोलाचा ठरणार आहे. जाहीर प्रचार बंद झाल्यानंतर छुपा प्रचार सुरु होणार आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यात गावागावात राजकीय वातावरण तापले आहे.

ऑक्टोबरमध्ये मुदत संपणाऱया 453 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यातील 30 ग्रामपंचायतींचे सरपंच तर 389 सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तर सरपंच पदासाठी 1141 व सदस्यपदासांठी 8918 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीसाठी 10 लाख 36 हजार उमेदवार मतदानाचा हक्क बाजविणार आहेत. निवडणुकीसाठी 1926 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय मतदान केंद्र अधिकारी, कर्मचारी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. जनतेमधून थेट सरपंच निवड होणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. गुरुवार, पाच ऑक्टोबर रोजी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रचारांचे नारळ फुटले होते.

उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गेल्या आठ दिवसांपासून प्रचाराचा धडाका उडवला होता. प्रचार फेरी, बैठकांवर उमेदवारांनी भर दिला होता. पायाला भिंगरी लावून प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. शेवटच्या टप्प्यात मातब्बर नेत्यांनीही प्रचारात सहभाग घेत निवडणुकीत रंग भरला. काही ठिकाणी मराठी चित्रपट सृष्टीतील सिनेअभिनेते व अभिनेत्रींनी प्रचारात भाग घेतला. सोमवार, 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. जाहीर प्रचार बंद करुन उमेदवारांनी रविवारी छुपा प्रचार करावा लागणार आहे. रविवारचा दिवस उमेदवारांसाठी निर्णायक दिवस आहे.

Related posts: