|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापूर विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा

सोलापूर विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर विद्यापीठाचा 13 वा दीक्षांत समारंभ आज होणार आहे. या सोहळ्यात 12 हजार 465 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून अक्कमहादेवी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. सबीहा या उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार यांनी दिली.

   यावेळी नूतन कुलसचिव डॉ. गणेश मंझा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील, वित्त व लेखाधिकारी बी.सी. शेवाळे, बीसीयुडीचे प्रभारी संचालक डॉ. विकास पाटील, उपकुलसचिव मलिक रोकडे, उपकुलसचिव यु.व्ही. मेटकरी, प्रा. डॉ. रवींद्र चिंचोळकर, प्रभारी विद्यापीठ अभियंता एल.पी. देशमुख आदी उपस्थित होते.

 अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार असणार आहेत. या समारंभात विविध विषयात गुणवत्ता प्राप्त केलेल्या 50 विद्यार्थ्यांना विविध सुवर्णपदकाने गौरविण्यात येणार आहे. 66 विद्यार्थ्यांना पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

  याप्रसंगी एकूण 18 हजार 581 इतके स्नातक पदवी प्राप्त करण्यास प्राप्त आहेत. त्यातील 12 हजार 465 समारंभात पदवी प्रदान करण्यात येणार असून, त्यापैकी 4 हजार 933 विद्यार्थी स्वत: उपस्थित राहून पदवी ग्रहण करणार आहेत. क्यूआर/क्यूसी कोडयुक्त सर्व प्रमाणपत्रे संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी लिंकड् आहेत. दरम्यान, समारंभाच्या तयारीसाठी 24 विविध समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. सर्व तयारी अंतिम टप्यात असून विद्यापीठ दीक्षांत समारंभासाठी सज्ज आहे, असे कुलगुरू डॉ. मालदार यांनी सांगितले.

 

Related posts: