|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » केरी येथील अपघातात युवक ठार

केरी येथील अपघातात युवक ठार 

प्रतिनिधी/पेडणे

केरी येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर 2.30 वाजता झालेल्या दुचाकी अपघातात देऊळवाडा-पालये येथील युवक विश्वेश केशव नाईक (वय वर्षे 23) याचा मृत्यू झाला.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, थोरलेबाग-केरी येथून हा युवक गुरुवारी मध्यरात्रीनंतर 2.30 वाजता डय़ूक या दुचाकी क्रमांक जीए 03, ए- ई 1515 या गाडीवरून पालये येथे घरी येत होता. थोरलेबाग-केरी येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या तारेच्या कुंपणाला त्याची दुचाकी आपटली व तो गंभीर जखमी झाला. त्याला 108 रुग्णवाहिकेने उपचारासाठी तुये येथील सरकारी इस्पितळात नेले असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला.

अपघाताचा पंचनामा हवालदार न्हानू ठाकूर यांनी पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक महेश केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केला. पुढील तपास पेडणे पोलीस करीत आहेत.

पालयेत शोककळा

युवक विश्वेश नाईक याच्या अपघाती निधनाबद्दल पालये परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वभावाने तो प्रेमळ होता व प्रत्येकाला आदराने हाका मारायचा. उत्तरीय तपासणीनंतर शुक्रवार 13 रोजी संध्याकाळी 4 वाजता त्याचा मृतदेह गोमेकॉच्या शवागारातून नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. संध्याकाळी 6.30 वाजता शोकाकूल वातावरणात पालये येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अंत्यविधीप्रसंगी विविध स्तरातील मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होती.

त्याच्या पश्चात वडील केशव, मात़ोश्री कालिंदी, बहीण सुखदा, चुलते नामदेव, सत्यवान, चुलतबंधू अजित, अमिर, राहुल, जयराम नाईक असा परिवार आहे.   

 

Related posts: