|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Vodafoneकडून मिळणार अवघ्या 96 रुपयात 10 जीबी डाटा

Vodafoneकडून मिळणार अवघ्या 96 रुपयात 10 जीबी डाटा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

 

रिलायन्स जिओ, भारती एअरटेल या मोबाईल कंपन्यांनी सर्वात स्वस्तात मोबाईल डाटा प्लॅन लाँच केल्यानंतर आता व्होडाफोननेही स्वस्तात डाटा पॅक लाँच केला आहे. अवघ्या 96 रुपयांत 10 जीबीचा इंटरनेट डाटा मिळणार आहे.

तसेच कंपनीने 147 रुपयांत आणखी एक प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅननुसार 12 जीबीचा डाटा मिळणार आहे. कंपनीने लाँच केलेले हे नवे प्लॅनस् दिल्ली-एनसीआरच्या काही निवडक युजर्सना याचा लाभ घेता येणार आहे. त्यानुसार कंपनीकडून संबंधित ग्राहकांना याबाबत मेसेज करण्यात येत आहेत. याशिवाय 121 डायल करुन युजर्स या प्लॅनबाबत माहिती घेऊ शकतात.