|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » प्रचार थंडावला, आता रात्रीचा ‘खेळ’ रंगणार!

प्रचार थंडावला, आता रात्रीचा ‘खेळ’ रंगणार! 

प्रतिनिधी/ सांगली

जिह्यातील 453 ग्रामपंचातीसाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला जाहीर प्रचार शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता थांबला. सोमवारी मतदान होणार असल्याने आज रविवारचा दिवस प्रचारासाठी बाकी आहे. मात्र जाहीर प्रचार न करता उमेदवारांनी छुपा प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. रात्रीच्या गुप्त खलबतांना वेग आला आहे. मतदार व उमेदवारांच्या हालचालींवर प्रतिस्पर्ध्यांनी जागता पाहरा ठेवला आहे.

ग्रामपंचायतीसाठी सोमवारी मतदान होत आहे. मतदानाच्या आधी 48 तास जाहीर प्रचाराची सांगत होते. त्यानुसार शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता प्रचाराची सांगता झाली. 5 ऑक्टोबर अर्ज माघारीनंतर जिह्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता. उमेदवारांच्या प्रचार सभा, प्रचार फेऱयांनी गावागावातील राजकीय वातावरण तापले होते. प्रचाराच्या पाच ते सहा फेऱया उमेदवारांनी गेल्या आठ दिवसांत पूर्ण केल्या आहेत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत त्यांना मतदान करण्याचे साकडे घातले आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दिग्गज नेत्यांनीही प्रचारात उडी घेत निवडणूकीत रंग भरला होता. काही ठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ वेगवेगळे फंडे वापरण्यात आले. सोशल मिडीयावरुनही प्रचार करण्यात आला.

जागता पाहरा सुरु

जाहीर प्रचाराची शनिवारी सांगता झाल्याने उमेदवारांनी सुटेकचा श्वास सोडला आहे. तरीही रविवारचा दिवस प्रचारासाठी बाकी आहे. शनिवारी सायंकाळनंतर  छुप्या प्रचाराने वेग घेतला आहे. रात्रीच्या बैठकांना जोर आला आहे. साम, दाम, दंड व भेद या चतुःसूत्रीचा वापर उमेदवारांच्याकडून करण्यात येत आहे. उमेदवारांना स्वतःकडे खेचण्यासाठी निर्यायक प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या हालचालींवर प्रतिस्पर्ध्यांनी जागता पाहरा ठेवण्यास सुरूवात केली आहे.

Related posts: