|Monday, September 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » लोकप्रिय गीतांचा अनोखा नजराणा शिंदेशाही बाणा

लोकप्रिय गीतांचा अनोखा नजराणा शिंदेशाही बाणा 

 महाराष्ट्रातील एक सांगीतिक घराणे ज्याला लोकसंगीताचा वारसा लाभला आहे, या घराण्याच्या तब्बल पाच पिढय़ा गेल्या बऱयाच वर्षांपासून संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. ज्या घराण्याने कव्वाली, पारंपरिक गाणी, भारुड, गोंधळ, प्रेम गीते इत्यादी गाऊन संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली असे शिंदे घराणे. प्रल्हाद शिंदेपासून सुरू झालेला हा संगीत प्रवास आल्हाद शिंदे म्हणजेच त्यांच्या पणतूपर्यंत सुरू आहे. संगीत क्षेत्रामध्ये अशी घराणी दुर्मीळच असतात ज्यांना पाच पिढय़ांचा वारसा लाभतो. कलर्स मराठी पहिल्यांदाच या घराण्याला एकत्र घेऊन येणार आहेत शिंदेशाही बाणा या कार्यक्रमामधून ज्यामध्ये ऐका सत्यनारायणाची कथा पासून देवा तुझ्या गाभाऱयाला अशा अनेक गाजलेल्या गाण्यांचा समावेश असणार आहे. लोकप्रिय गाण्यांचा नजराणा शिंदेशाही बाणा 22 ऑक्टोबरला संध्या 6.30 वाजता  कलर्स मराठीवर.

शेकडो लोकांनी भरलेले सभागफह, टाळय़ांचा कडकडाट, वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच आणि साथीला गाण्यातले धफवतारे. आनंद शिंदे ते आल्हाद शिंदे सगळे एकाच मंचावर येऊन गाणे सादर करणार. त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ प्रेक्षकांसाठी एक मेजवानी ठरणार हे नक्की. हे शिंदे घराणे त्यांच्या संगीत कारकिर्दीतील काही निवडक आणि लोकप्रिय अशा गाण्यांचा नजराणा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात आनंद शिंदेनी काही सुप्रसिद्ध गाण्यांनी केली, ज्यामध्ये पार्वतीच्या बाळा, मोरया मोरया यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांचेच सुपुत्र आदर्श शिंदे ज्याने लोकसंगीताच्या सोबतच भक्तिगीते, चित्रपट गीते म्हणून प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्याचेच प्रसिद्ध देवा तुझ्या गाभाऱयाला हे गाणे म्हटले आणि सभागफहामध्ये एक वेगळेच वातावरण तयार झाले. अंबे कृपा करी हे गाणे सुरू झाल्यावर कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली. इतकेच नव्हे तर या गाण्यानंतर आदर्शने ‘दुधात नाही पाणी’ ही अप्रतिम गवळण सादर केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. शिंदे कुटुंबांमधील एकापेक्षा एक गायकांची ही लोकप्रिय गाणी प्रत्यक्षात ऐकण्याची संधी प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे मिळाली. आनंद शिंदे आणि त्यांचे भाऊ मिलिंद शिंदे यांनी प्रल्हाद शिंदे यांचे ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे गाणं म्हटले आणि प्रल्हाद शिंदे यांना मानवंदना अर्पण केली. उत्कर्ष शिंदे याने देखील त्याचे घुंगराच्या तालामंदी आणि चिमणी ही गाणी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमामध्ये आनंद शिंदे यांच्या नातवाने म्हणजेच आल्हादने गोड स्वरात आपल्या गाण्याची झलक उपस्थितांना दाखवली आणि त्यांची मने जिंकली. संपूर्ण शिंदे परिवाराची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. या कार्यक्रमाद्वारे प्रल्हाद शिंदेंपासून सुरू झालेला हा संगीतमय प्रवास प्रेक्षकांना ऐकायला मिळाला. कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी शिंदे परिवाराला साथ दिली सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि आपल्या सगळय़ांचा लाडका अमित राज. तसेच मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, तेजा देवकर यांनी अप्रतिम नफत्य सादर केले.