|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Automobiles » 2.5 लाखांत मिळणार BMW Cycle

2.5 लाखांत मिळणार BMW Cycle 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध लग्झरी कार निर्माता कंपनी BMW ने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी हायब्रिड सायकल लाँच केली आहे. ही एक इलेक्ट्रिक सायकल असून, याची किंमत 2 लाख 60 हजार रुपये असणार आहे.

– असे असतील या सायकलचे फिचर्स –

– कंपनीकडून या सायकलला 504 वॅटची हाय-परफॉर्मस् बॅटरी देण्यात आली आहे.

– या सायकलच्या बॅटरीला एकदा फुल चार्ज केल्यास 100 किलोमीटरपर्यंत ही सायकल धावू शकेल.

– BMWकडून या सायकलमध्ये एक दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून, 90 एनएम पीकचा टार्क निर्माण करण्याची क्षमता यामध्ये असणार आहे.

– तसेच या बॅटरीच्या माध्यमातून 250 वॅटची पॉवर निर्माण करण्याची क्षमता यामध्ये असणार आहे.

– कंपनीने या ई-बाईकमध्ये ऍल्युमिनियम प्रेम, मडगाडमध्ये एलईडी लाइट, आरामदायी आसनक्षमता, ऍडव्हान्स बॅलेन्स असे अत्याधुनिक फिचर्स ऍड करण्यात आले आहेत.

– किंमत – 2 लाख 60 हजार रुपये.