|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » दिवाळी विशेष ; धनत्रयोदशीचे महत्त्व

दिवाळी विशेष ; धनत्रयोदशीचे महत्त्व 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दिवाळी हा अनंद आणि सुखसमुद्धी देणारा सण. या सणात धनत्रयोदशीला अनन्यसाधरण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती, धन यांच्याबद्दल आपल्या मनात असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हटले जाते. धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. आजच्या दिवशी शेतकरी व कारागील लोक आपल्या व्यवसायाशी संबंधीत अवजारांची पूजा करतात. शेतकरी नांगर, तिफन, कुळव यांसारख्या शेतीशी संबंधीत सर्व अवजारांची पूजा करतात. तर व्यापारी दिवशी पाटावर लक्ष्मीची मुर्ती ठेवून तीची पूजा करतात. हिशोबाच्या वह्या, सोने-नाणे तसेच लिखापडीसाठी आणलेल्या वह्यांचीही या दिवशी पूजा केली जाते. शेतकऱयांसाठी शेतातून आलेले नवे धान्य हेच त्यांचे खरे धन असते. हीच त्याची संपत्ती असते. त्यामुळे तो धान्याची पूजा करतो. त्यासाठी धने, गुळ, खोबरे व पुरणपोळीचा नेवैद्य दाखवतात. तसेच झेंडू , शेवंती यांच्या फूलांचा हार, फुले देवाला वाहतात. आजच्या दिवशी अंगणभर पणत्या लावल्या जातात. घरांना विदय़ूत रोषनाई केली जाते. घरे, गाव, शहरे व सारा आसमंत पणत्या आणि विदय़ुत रोषनाईने उजळून निघतो.