|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पोर्तुगाल-स्पेनच्या जंगलांमध्ये वणवा, 39 ठार

पोर्तुगाल-स्पेनच्या जंगलांमध्ये वणवा, 39 ठार 

लिस्बन

 पोर्तुगालच्या जंगलांमध्ये पेटलेल्या वणव्यामुळे मागील 24 तासांमध्ये 36 जणांचा मृत्यू झाला. तर शेजारच्या स्पेनमध्ये देखील वणवा ओफेलिया वादळामुळे वणवा भडकल्याने 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला. स्थिती पाहता पोर्तुगालमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली. पोर्तुगालने स्थितीला सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मागितली आहे.  मोठय़ा संख्येत लोक बेपत्ता आहेत.

पोर्तुगालमध्ये ओफेलिया वादळापोटी वेगवान वारे वाहत असल्याने आग आणखीनच फैलावली. पोर्तुगालच्या मध्य आणि उत्तर भागात 150 ठिकाणी आग फैलावली. हा वणवा विझविण्यासाठी 4,000 अग्निशमन कर्मचारी कार्यरत असून यातील 63 जण जखमी झाल्याची माहिती तेथील नागरी संरक्षण प्राधिकरणाने दिली. पोर्तुगाल सरकारने मंगळवारपासून 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याची घोषणा देखील केली.

पोर्तुगालचे पंतप्रधान ऍण्टोनियो कोस्टा यांनी आणीबाणीची घोषणा करत आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीचे आवाहन केले. आगीच्या संकटामुळे 3 प्रमुख मार्ग बंद करण्यात आले, तसेच वणव्यानंतर देशातील तापमान सरासरीच्या पुढे गेले.

वसाहती रिकाम्या, शाळांना सुटी

गॅलिसियाची आग स्पेनच्या सर्वाधिक लोकसंख्या असणाऱया शहरांपैकी एक व्हिगोच्या चारहीबाजूने फैलावली. येथील विद्यापीठाची वसाहत यामुळे रिकामी करविण्यात आली तसेच शाळांना सुटी देण्यात आली. स्पेनच्या सशस्त्र दलाचे 600 सैनिक आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तैनात करण्यात आले. यात हवाईदलाचे सैनिक देखील सामील आहेत.  पूर्वनियोजित कटाने ही आग लावण्यात आल्याचा दावा स्पेनच्या अधिकाऱयांनी केला.