|Monday, September 16, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » व्हॉट्सऍपवर आता कळणार तुमचे लाईव्ह लोकेशन

व्हॉट्सऍपवर आता कळणार तुमचे लाईव्ह लोकेशन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

व्हॉट्सऍपने लोकेशन शेअरिंगचे फीचर अपडेट केले असून नव्या फीचरमध्ये तुमचे लाईव्ह लोकेशन दुसरीकडे आपल्या लाइव्ह लोकेशनबाबत ‘गंडवागंडवी’करणाऱयांनाही या फीचरने चांगलीच फजिती होणार आहे. विशेष म्हणजे तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर केले असेल तर संबंधित ठिकाणी पोहोचेपर्यंत संपूर्ण प्रवास तुमच्या मित्राला कळू शकणार आहे.

व्हॉट्सऍपने या फीचरची उपयुक्तता सांगताना अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला भेटायला जात असाल किंवा तुम्ही सुरक्षित आहात हे घरच्यांना कळवायचे असेल तर हे फीचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या फिचरद्वारे तुमचे रियल टाइम लोकेशन तर कळेलच पण तुम्ही नेमके कुठे आहात तसेच तुम्ही कोणत्या संकटात तर नाही आहात ना, हेसुद्धा कळू शकणार आहे.