|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बादशाह बजाजच्या एक्सचेंज ऑफरला ग्राहकांचा प्रतिसाद

बादशाह बजाजच्या एक्सचेंज ऑफरला ग्राहकांचा प्रतिसाद 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

बजाज कंपनीच्या दुचाकीमधील विविध गाडय़ांसाठी इचलकरंजी, कुरूंदवाड व कागल येथील शोरूममध्ये सर्वोत्तम एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. 18 ऑक्टोंबर ते 25 ऑक्टोंबरपर्यंत ही योजना आहे. येथील बादशाह बजाजचे इरफान बागवान यांनी ग्राहकांना अधिकाधिक लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केली असून याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे असून याचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन बागवान यांनी केले आहे.

बादशाह उद्योग समूहाचे विविध व्यवसाय आहेत. बजाज कंपनीच्या दुचाकी विक्रीमध्ये काही महिन्यांपूर्वी बादशाह बजाजला महाराष्ट्रातील सर्वाधिक दुचाकी विक्रीचा पुरस्कार देवून गौरवण्यात आले होते. इचलकरंजी येथे त्यांचे मुख्य कार्यालय असून कुरूंदवाड व कागल येथेही बजाज दुचाकीचे शोरूम सुरू केलेली आहेत. ग्राहकांना दिली जाणारी विनम्र सेवा, विक्री पश्चात दिली जाणारी सेवा व ग्राहकांना दिल्या जाणाऱया विविध फायदेशीर योजनांमुळे बादशाह बजाजने अल्पावधीतच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळवला आहे.

बादशाह उद्योग समूहामध्ये इण्डेण गॅस, पेट्रोलिंक्स, लुनार्स शूजची एजन्सी, कापड निर्मिती व बजाज कंपनीच्या दुचाकी विक्रीची डिलरशीप यांचा समावेश आहे. इरफान बागवान व त्यांचे बंधू यांचा वैचारीक समन्वय व दुरदृष्टीने हा उद्योग समूह  भरभराटीस आला आहे.

Related posts: