|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » केदारनाथ येथे आज पंतप्रधान मोदींची सभा

केदारनाथ येथे आज पंतप्रधान मोदींची सभा 

नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा केदारनाथाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. परंतु यावेळी पंतप्रधान मोदी देवदर्शनासमवेत केदारपुरीमध्ये एका सभेला संबोधित करतील. यावेळी केदारनाथमध्ये विविध योजना आणि विकासकामांचा शुभारंभ पंतप्रधान मोदी करतील. तेथील सरस्वती-मंदाकिनीची सुरक्षा भिंत, शंकराचार्यांच्या समाधिस्थळाचा जिर्णोद्धार, तीर्थ पुरोहितांची 70 भवने आणि मार्ग रुंदीकरण कार्यांचा शुभारंभ यावेळी होईल.

मोदींच्या दौऱयावरून प्रशासनासमवेत भाजपकडून देखील तयारी सुरू आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष अजय भट्ट यांनी स्वतः तयारींचा आढावा घेतला. तर उत्तराखंड सरकारचे मंत्री धनसिंग रावत तयारींवर नजर ठेवून आहेत. मोदींच्या सभेला हजारो जण उपस्थित राहणार असून त्यांच्या राहण्या-जेवण्याची पूर्ण व्यवस्था केदारनाथमध्ये करण्यात आल्याची माहिती भट्ट यांनी दिली.

Related posts: