|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » भारत-अमेरिका संबंध पुढील 100 वर्षे दृढ राहणार

भारत-अमेरिका संबंध पुढील 100 वर्षे दृढ राहणार 

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :

भारताशी संबंधित धोरणावरून केलेल्या आपल्या पहिल्या भाषणात विदेशमंत्री रेक्स टिलरसन यांनी भारत-अमेरिकेच्या पुढील 100 वर्षांच्या संबंधांची दशा आणि दिशा निश्चित केली. अमेरिकेच्या विदेश विभागाच्या एका अधिकाऱयाने याची माहिती दिली. अमेरिका भारताचा सर्वात विश्वासार्ह सहकारी आहे. चीनची कृत्ये आव्हानात्मक असताना अमेरिका-भारत संबंध महत्त्वाचे ठरतात असे टिलरसन म्हणाले.

चीन निश्चितपणे टिलरसन यांचे भाषण ऐकणाऱया श्रोत्यांपैकी एक आहे.  भारत-प्रशांत क्षेत्राचे सर्व देश हे भाषण गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा करतो असे अमेरिकेच्या अधिकाऱयाने म्हटले. या अगोदर टिलरसन यांनी आपल्या भाषणात भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर नेण्याची संधी असल्याचे वक्तव्य केले. टिलरसन पुढील आठवडय़ात भारत दौऱयावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱयात द्विपक्षीय संबंध आणखीन दृढ होतील असे मानले जाते.

भारताशी मैत्री वाढवावी

अनिश्चितता आणि तणावाच्या या वातावरणात भारताला एका विश्वासू मित्राची गरज आहे. भारताला आवश्यक असणारा विश्वासू मित्र अमेरिका असल्याची हमी मी देऊ इच्छितो. भारत आणि अमेरिका दोन्ही देश जागतिक शांतता, विकास आणि स्थैर्याबद्दलची प्रतिबद्धता अधोरेखित करतात. अमेरिकेने भारतासोबतचे आपले संबंध दृढ करण्याची ही योग्य वेळ आहे. भारताची सकारात्मक विचारसरणी, बलशाली लोकशाही आणि जगात त्याच्या वाढत्या प्रतिमेमुळे अमेरिकेने भारतासोबतची मैत्री आणखीन वाढवावी असे टिलरसन म्हणाले.

Related posts: