|Thursday, August 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » जिओ ग्राहकांना फटका, डेटा पॅकच्या दरात वाढ

जिओ ग्राहकांना फटका, डेटा पॅकच्या दरात वाढ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रिलायन्स जिओने प्राईम पोस्टपेड डेटा प्लॅनमधल्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे जिओ ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

जिओने पोस्टपेड आणि प्रीपेड प्राईम प्लॅनमध्ये बदल केले आहेत. या नव्या बदलानुसार 309 रूपयांनमध्ये 60 जीबी मिळणारा डेटा, आता केवळ 30जीबी मिळणार आहे . तसेच 509मध्ये मिळणारा 120 जीबी डेटा, आता केवळ 60 जीबी डेटा मिळणार आहे. रिलायन्स जिओने 84 दिवसांच्या डेटा प्लानमध्ये तब्बल 15टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीनुसार 84 दिवसांच्या प्लॅनसाठी तुम्हाला 459 रूपये मोजावे लागणार आहेत. ज्यामध्ये ग्राहकाला दिवसाला 1 जीबीचा 4जी डेटा वापरता येणार आहे. दुसरीकडे जिओने एका खास ऑफरही दिली आहे. जिओने अवघ्या 52 रूपयांमध्ये एका आठवडय़ासाठी , तर 98 रूपयांमध्ये दोन आठवडय़ांसाठी फ्रि, व्हाईस, एसएमएस आणि अनलिमिटेड डेटा पॅक उपलब्ध करून दिला आहे.