|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » श्रीरामाची पूजा करणाऱया महिलांवर देवबंद नाराज

श्रीरामाची पूजा करणाऱया महिलांवर देवबंद नाराज 

देवबंद

 मुस्लीम महिलांद्वारे वाराणसीत भगवान श्रीरामाची पूजा करण्यात आल्याने वाद निर्माण झाला. दारुल उलूम देवबंदच्या मौलानांनी श्रीरामाची आरती करणाऱया महिलांवर टीका केली. मौलानांनी त्यांना मुस्लीम मानण्यास नकार दिला. इस्लाममध्ये अल्लाशिवाय दुसऱया कोणासमोर शिर झुकविले किंवा पूजा केली तर  संबंधित व्यक्ती मुस्लीम राहत नाही असा दावा मौलानांनी केला. मुस्लीम केवळ अल्लालाच मानतात, याशिवाय दुसऱया कोणाची ते प्रार्थना करू शकत नाही असे देवबंदने म्हटले. अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिवाळीचा सण साजरा करत असताना वाराणसीत मुस्लीम महिलांनी भगवान श्रीरामाची आरती केली. या आरतीचे नेतृत्व नाजनीन अन्सारी यांनी केले. संस्कृती आणि हिंदू-मुस्लिमांच्या सामाजिक एकतेसाठी काम करते, भगवान श्रीराम आमचे पूर्वज आहेत. आम्ही आमचे नाव आणि धर्म बदलू शकतो, परंतु आमचे पूर्वज बदलू शकत नाही असे अन्सारी यांनी म्हटले.