|Sunday, February 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांचा राजीनामा

सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांचा राजीनामा 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताचे सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांनी नुकताच वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला. कौटुंबिक कारणांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

जून 2014 मध्ये रणजित कुमार यांची सॉलिसिटर जनरल पदावर नियुक्ती करण्यात आली होती. अलिकडेच त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना केंद्र सरकारने  पुन्हा मुदतवाढ दिली होती. मात्र, मला आता कुटुंबियांना वेळ द्यायचा आहे, असे स्पष्ट करत रणजीत कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. काही महिन्यांपूर्वीच मुकूल रोहतगी यांनीदेखील ऍटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ रणजीत कुमार यांनी राजीनामा दिल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. कुमार यांनी गुजरात सरकारसाठी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणात त्यांनी गुजरात सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली होती. घटनात्मक कायदे, नागरी सेवा, करासंबंधीच्या कायद्यांविषयीचे जाणकार म्हणून त्यांना ओळखले जाते.

Related posts: